शेतकऱ्यांनी केली दिवाळी गोड करण्याची मागणी
अकोल्यात शेतकऱ्यांनी दिले उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन;
अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील आगर येथे गेल्या जुलै महिन्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले असून सर्वे होऊनही अद्यापर्यंत मदत न मिळाल्यामुळे आज आगर येथील शेतकऱ्यांनी उप जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनातून शासनाला तुम्ही जसा दिवाळीत आनंदाचा शिधा देता तसा शिधा दिवाळी पूर्वी आम्हाला देऊन आमची दिवाळी गोड करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.