बँकेकडून कर्ज फेडीसाठी सतत तगादा सुरु असल्याने येवल्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Update: 2021-11-03 15:34 GMT

येवला : सततच्या नैसर्गिक संकटाने आणि शेतीचे नुकसानामुळे आधीच शेतकरी बेजार झालेला असताना, बँकेकडून सतत कर्जसाठी तगादा सुरु असल्याने मानसिक तणावातून एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्यहत्या केल्याची घटना येवल्यातून समोर आली आहे. अशोक आनंदा लांडे असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर बँकेचे 3 ते 4 लाखाचे कर्ज आहे. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुले आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे उपजिविकेचीच समस्या आ वासून उभी असताना बँकेचे कर्ज कसे फेडणार हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला, त्यातून बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी सतत होत असलेल्या तगाद्याने मानसिक खच्चीकरण झाल्याने त्यांनी आत्महत्या केली.

मयत शेतकरी अशोक लांडे यांची 20 एकर शेती आहे. त्यात मका, कांदा आणि कांद्याची रोपे अशी पिके ते घेत होते.पिक लागवडीसाठी त्यांनी एचडीएफसी बँकेकडून वडिल आनंदा लांडे यांच्या नावावर 4 लाखांचे कर्ज घेतले होते. अतिवृष्टीमुळे लांडे यांच्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान झाले. लांडे यांचे अतोनात नुकसान झाले. उत्पन्नच आले नाही त्यामुळे बँकेचे कर्ज फेडणे अशक्य झाले. मात्र बँकेकडून कर्जाचे हफ्ते वसुल करण्यासाठी सतत तगादा सुरु होता.

Tags:    

Similar News