सोनं गहाण ठेवून पिकवलेल्या टोमॅटोला कवडीमोल भाव
येवल्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात;
कधी अवकाळी तर कधी दुष्काळ अशा अनेक संकटांवर मात करत येवला तालुक्यातील मुखेड येथील सचिन दाते या शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे सोने गहाण ठेवत टोमॅटो पिकवले. मात्र ज्यावेळेस टोमॅटो विक्रीची वेळ आली. त्यावेळी अक्षरश; टोमॅटोला 40 ते 45 रुपये कॅरेट असा कवडीमोल भाव मिळू लागल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे या शेतकऱ्याचे मुश्किल झाले असल्याने आपली जनावर तरी पोट भरतील याकरता उभ्या टोमॅटोच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली असून आता गहाण ठेवलेले सोने कसे सोडवावे? असा मोठा प्रश्न या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.