शेतकऱ्यांच्या जीवनातील मृग नक्षत्राचे महत्त्व...
मृग नक्षत्रात पाऊस न पडल्याने शेती उत्पादनावर कसा होतो परिणाम...!
शेतकऱ्यांसाठी मृग नक्षत्र हे अत्यंत महत्त्वाचा नक्षत्र म्हणून मानला जातो कारण या नक्षत्रामध्ये पडलेला पाऊस शेती उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात या नक्षत्रात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्याचे शंभर टक्के पदरात पडतं आणि यामुळेच शेतकरी मार्ग नक्षत्राची वाट मात्र चातक पक्षासारखी बघत असतो याविषयीचा मॅक्स महाराष्ट्राचा एक स्पेशल रिपोर्ट...
मृग नक्षत्रामध्ये जर पेरणी झाली तर बाजरी तूर मूग उडीद मटकी कापूस ही पिकं चांगली उतार देतात, मृग नक्षत्र नंतर आदरा नक्षत्र आले तर त्यामध्ये 15 ते 20 टक्के उत्पादनामध्ये घट होते जो पिकाला उतार पडायचा आहे तो पडत नाही, योगिता नक्षत्रामध्ये पाऊस न पडण्या मागची कारणे असे आहेत की हवेमध्ये प्रदूषण होत आहे यामुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला पाहायला मिळत आहे, त्यामध्ये मध्येच अवकाळी पाऊस येणार आणि याच अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं त्यामध्ये भाजीपाला पीक असेल किंवा फळपिका असतील त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं...
काय आहे मृगनक्षत्राचे महत्त्व...
मृग नक्षत्राची महत्त्व एवढे आहे की मृग नक्षत्रामध्ये जर पेरणी झाली तर उत्पादन शंभर टक्के मिळते, जर मृग नक्षत्र टाळून पुढे गेलं तर उत्पादनामध्ये 15 ते 20 टक्के घट येते त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनावर परिणाम होतो, बीड जिल्ह्यात यावर्षी वळवाचा पाऊस पडलेला नाही अजून एकही थेंब न आल्यामुळे शेतीची मशागत झालेली नाही, पूर्वी अक्षय तृतीया झाली की कल्याण कृतिका निघत असत... आणि कल्याण कृतिका म्हणजे वळवाचा पाऊस पडायचा आणि त्याच्यानंतर नदीला मोठ्या प्रमाणात पाणी यायचं आमच्या लहानपणी मोठ्या प्रमाणात नद्या वाहत असायच्या, आता नदीचं पाणी आटलं आहे विहिरीचं पाणी आटलं आहे आता बोरवेल सुरू झाले आहेत त्याला पण पाणी लागत नाही, रोहिणी नक्षत्र मध्ये पाऊस पडल्यामुळे जमिनीची मशागत व्हायची आणि या मशागतीमुळे जमीन भुसभुशीत व्हायची आणि ओल धरून ठेवण्याची क्षमता जमिनीमध्ये राहायची... शेतकरी नग नक्षत्राची वाट पाहिजे आणि मग मृग नक्षत्रामध्ये भुईमूग पेरायचे एक चित्त भुईमूग पेरल्यानंतर एक पोतं शेंगा निघायच्या प्रत्येक नक्षत्र हे वेगवेगळे काम करत आहे.
नक्षत्र हे एकूण 27 नक्षत्र आहेत यामध्ये काही महत्त्वाची नक्षत्र आहेत आणि ज्या नक्षत्रामुळे ऋतूवर व कालचक्रावर मोठ्या प्रमाणात वर त्याचा परिणाम होतो.
यामध्ये महत्त्वाचे नक्षत्र
अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आद्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तर फालगुनी, हस्त, चित्रा, स्वाती,विशाखा, अनुराधा, ज्येष्ठ, मूला, पूर्वा वाढ, उत्तरावाढ, श्रावण, धनिष्ठा, पूर्व भाद्र, उत्तरभाद्र, रेवती ही नक्षत्र महत्त्वाची मानले जातात.
पौराणिक दृष्टया पाहावयास गेले तर नक्षत्रांना खुप महत्व असलेले आपणास दिसुन येते. याला कारण नक्षत्रास आपण दक्ष प्रजापतीची कन्या म्हणुन ओळखत असतो. पुराणात असे नमुद केलेले आपणास दिसुन येते की त्रषी मुनींनी आकाशाचे बारा भागात विभाजन केले होते. ज्याची ओळख आपल्याला बारा राशींचे राशी भविष्य ह्या नावाने असलेली दिसुन येते.
कसा होता पुर्वीचा काळ...
पूर्वीच्या काळी मोठ्या प्रमाणात झाडी असायची आणि या झाडीमुळे आकाशामध्ये असलेले ढग आणले जायचे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडायचा विशेष करून सिंधीचे जे झाड आहे ते उंच झाड असल्याने ते ढग अडवत असतं आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असायचा आता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे आणि याच कसली मुळे पावसाचे प्रमाणही कमी झाला आहे, झाड म्हणजे आपलं जीवन आहे, आणि माझं प्रत्येकाला सांगणं आहे की आपल्या शेतामध्ये आपल्या घराच्या अंगणामध्ये एक तरी झाड लावा ते जगवा जेणेकरून त्याच्यापासून आपल्याला सावली मिळेल त्याचबरोबर त्याच्यापासून ऑक्सिजन सुद्धा मिळतो म्हणून माझं प्रत्येक नागरिकाला सांगणं आहे की आपण एक तरी झाड लावा.