साताऱ्यात मंत्र्याच्या घरासमोर शेतकऱ्याचा आक्रोश
सातारा जिल्ह्यातील खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून देखील कारवाई होत नसल्याने 15 ऑगस्ट ला शेतकऱ्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला.
सातारा जिल्ह्यातील खराडेवाडी येथील जमीन सावकाराने बळकावून देखील कारवाई होत नसल्याने 15 ऑगस्ट ला शेतकऱ्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. खराडेवाडी येथील शेतकरी सुरेंद्र पांडुरंग जगताप यांची एकूण दहा एकर क्षेत्रातील शेत जमीन खाजगी सावकार संजय निकम, संजय गरुड, दिगंबर आगवणे, गोरख नवले, रूपाली झाडे, प्रमोद धाराशिवकर, शाकीर महात, सुरेखा जगताप, सोमनाथ जगताप व त्यांचे साथीदार यांनी जबरदस्तीने दहा एकर जमीन बळकवली असून वारंवार 2016 पासून वारंवार महसूल आणि ग्रह खात्याला लेखी निवेदन देऊन सुद्धा न्याय न मिळाल्याने येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.