मागण्या मान्य करा अन्यथा चड्डी मोर्चा काढणार

गळ्यात बेदाणा हार आणि मोफत बेदाणा वाटप करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढून असा सक्त इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे, पहा मॅक्स किसान चा स्पेशल रिपोर्ट...;

Update: 2023-05-18 14:42 GMT

:गळ्यात बेदाणा हार आणि मोफत बेदाणा वाटप करत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर चड्डी मोर्चा काढून असा सक्त इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे, पहा मॅक्स किसान चा स्पेशल रिपोर्ट

Full View

द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने एक लाख रूपयांचे अनुदान, तसेच अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला.

पोलीस आणि कार्यकर्त्याच्या मध्ये जोरदार धुष्मचक्री झाली. मागण्या मान्य न झाल्यास ५ जून रोजी रोजी 'चड्डी मोर्चा' जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून, पालक मंत्र्याच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

गळ्यात बेदाणा हार आणि मोफत बेदाणा वाटप करत या मोर्चाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्या पासून सुरुवात झाली. प्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चाला प्रारंभ झाला.

द्राक्ष बेदान्याला दर मिळालाच पाहिजे,गंडा घालणाऱ्या दलालांना कडक शासन झालेच पाहिजे आदीसह अन्य घोषणा देत जिल्हाध्यक्ष महेश खराडे संजय बेले संजय खोलखुंबे भरत चौगुले उमेश मुळे रावसाहेब पाटील, बाळासाहेब लिंबेकाई सूरज शेख,शिवाजी पाटील ,सूरज पाटील, राजेंद्र माने ,अमित रवतले, नंदकुमार नलवडे ,दामाजी दुबल, भुजग पाटील राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आत जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला त्यावेळी जोरदार धूमचक्री झाली त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांना बेदाणा वाटप करून शासनाचा निषेध करण्यात आला

यावेळी आंदोलका समोर बोलताना खराडे म्हणाले द्राक्ष बेदाण्याचे दर फारच घसरले आहेत.त्यामुळे द्राक्ष बेदाणा उत्पादक अडचणीत सापडला आहे आज पर्यंत द्राक्ष बागायदारांनी शासनाकडे कधीच काही मागितले नाही. मात्र आता त्याला मदतीचा हात शासनाने देणे गरजेचे आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रती क्विंटल 300 रुपये मदत दिली त्याच धर्तीवर द्राक्ष बेदाणा उत्पादकाला एक लाख रुपये अनुदान द्यावे. द्राक्ष बेदाना खाणे आरोग्यास हितकारक आहे हे सांगणारी जाहिरात टीव्ही वरती पणन महामंडळाने सुरू करावी त्या शिवाय खप वाढणार नाही पृथ्वी चे तापमान वाढत आहे त्यामुळे हवामान बदलत आहे त्याचा फटका द्राक्ष शेतीला बसत आहे त्यामुळे द्राक्ष पूर्ण पणे विमा सुरक्षित केली पाहिजे सध्याची पीक विमा योजना बंद करून सुधारित बारमाही विमा योजना सुरू करावी बेदाणा बॉक्स चे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत , तूट 250 ग्रॅम च धरावी , बेदाणे पेमेंट 21 दिवसात त्यानंतर दिल्यास 2 टक्के व्याज द्यावे कीटक नाशके व स्टोरेज भाड्यावरील

जीएसटी कमी करावा काजू महामंडळाच्या धर्तीवर बेदाणा महामंडळ स्थापन करावे..बाजार समितीच्या अखत्यारीतील सर्व मागण्या येत्या आठ दिवसात बैठक घेवून मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

राज्य पातळीवरील मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी येत्या पाच जून रोजी चड्डी मोर्चा काढून पालक मंत्र्याच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला यावेळी अजित हालिगले अनिल पाटील चंद्रकांत पाटील बाळासो खर्माते रमेश माळी निशिकांत पोतदार आशिष पाटील अनिल शिंदे सुरेश पाचीब्रेआदीसह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Tags:


Tags:    

Similar News