ई-पीक पाहणीतून प्रिसिजन फार्मिंग: आनंद रायते अप्पर जमा बंदी आयुक्त Part-1
शेतीला प्रिसिजन करण्यासाठी हा प्रकल्प भविष्यवेधी ठरेल असा विश्वास हा राज्याचे राज्याचे Additional settlement Commissioner /अप्पर जमा बंदी आयुक्त आनंद रायते यांनी MaxKisan ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले..;
कन्याकुमारी ते काश्मीर भारत मोजण्याचे ऐतिहासिक काम भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून दोनशे वर्षांपूर्वी करण्यात आले. आता राज्याच्या जमाबंदी आयुक्तालयाकडून राज्याच्या शेतीच्या भविष्याचे परिवर्तन करण्यासाठी ई-पिक पाहणी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंदणी ॲप मध्ये करून लागवड मागणी पुरवठा आणि धोरण निश्चितीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरत आहे. राज्यातील दीड कोटी खातेदारांनी एक कोटी पन्नास लाख हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर हा प्रकल्प यशस्वी ठरला आहे.. भविष्याच्या दृष्टीने शेतीला प्रिसिजन करण्यासाठी हा प्रकल्प भविष्यवेधी ठरेल असा विश्वास हा राज्याचे राज्याचे Additional settlement Commissioner /अप्पर जमा बंदी आयुक्त आनंद रायते यांनी MaxKisan ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सांगितले..