पाऊस नसल्यामुळे सुकलेल्या पिकांचा जनावारांना चारा म्हणून वापर
पाऊस नसल्यामुळे सुकलेल्या पिकांचा जनावारांना चारा म्हणून वापर;
जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली चांगला पाऊस पडेल आशेवर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पीक लागवड केली.परंतु मधल्या काळामध्ये पिकाला पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे मका,ज्वारी,बाजरी,उडीद,मूग ही पिके हातची गेली आहेत.यामुळे शेतकऱ्यांना या पिकांचा चारा म्हणून उपयोग करावा लागत आहे.पावसाला यावर्षी उशीर झाला त्यामुळे मका,ज्वारी,बाजरी ही पीक आले नाही त्याचा आम्ही जनावरांना चारा म्हणून सध्या उपयोगात आणत आहोत तरी शासनाने शेतकऱ्यांबद्दल विचार करावा असे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.