गोंदिया जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे जिल्ह्यातील हलक्या स्वरूपाच धान पीक हे कापण्यासाठी तयार झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्याचा देवरी तालुक्यातील ग्राम डवकी येथे राऊत यांच्या शेतात धान पीक परतीच्या पावसामुळे धान जमिनीवर पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आणि हे धान पीक आठ दिवसात कापण्यासाठी तयार झाले असून अनेक शेतामध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी असल्यामुळे सध्या पाणी सुकण्याची वाट शेतकरी पाहत आहेत आणि हे पाणी सुकल्यानंतर भात पिकाची कापणे करण्यासाठी शेतकरी हा सज्ज होण्याच्या मार्गावर आहे. आणि या काळात जर परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली, तर मोठ्या प्रमाणात उभ्या धान पिकांला हानी मोजणार असल्याचे शेतकरी पवन राऊत यांनी सांगितले.