जिऱ्याच्या फोडणीला महागाईची झळ
मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे शेतमालाचे बाजार वधारले असून आता पाठोपाठ आता दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याच्या फोडणीला महागाईची झळ बसली आहे.;
मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्यामुळे शेतमालाचे बाजार वधारले असून आता पाठोपाठ आता दररोजच्या जेवणात वापरल्या जाणाऱ्या जिऱ्याच्या फोडणीला महागाईची झळ बसली आहे.गेल्या आठवड्याभरात जिऱ्याच्या किंमतींमध्ये किलोमागे 50 ते 100 रुपयांची वाढ झाली आहे.गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला 450 ते 550 रुपये किलो असलेले जिरे आता तब्बल 650 ते 750 रुपये किलोवर पोहोचले आहे.
- जिऱ्याचा वापर हे सर्वाधिक महाराष्ट्रीयन आणि गुजराती आणि मारवाडी लोक करतात, सध्या आवक कमी झाल्यामुळे दर वाढले आहेत.पहिले एक किलोसाठी 450 ते 550 रुपयाला मिळणारे जिरे सध्या 650 ते 750 रुपये किलोने विकवले जात आहे.कमी मालाचे उत्पादन झाल्यामुळे बाजारात आवक कमी झाली त्यामुळे तब्बल 50 ते 60 टक्क्यांनी दरवाढ झाली आहे, असे स्थानिक व्यापारी पारस शहा यांनी सांगितले.