नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत मिळणार...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत मदत मिळणार मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची माहिती;

Update: 2024-06-29 12:18 GMT

राज्यात अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झालं होत यात गहू,हरभरा,मका कापूस पिकांचे मोठं नुकसान झालं होत तसंच फळ पिकांचही नुकसान झालं होत सरकारने तातडीने भरपाई देण्याची घोषणा केली होती मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही भरपाई मिळत नाही.

राज्यात या वर्षाच्या सुरवातीलाच जानेवारी ते मे महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. त्यात पंचनाम्यानुसार २ लाख ९१ हजार ४३३ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. एनडीव्हीआय (सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक) निकषानुसार १५ जुलै २०२४ पर्यंत शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. काँग्रेस आमदार डॉ. नितीन राऊत यांनी सरकारला प्रश्न विचारला होता.

यां प्रश्नाला उत्तर देतांना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांनी सांगितले की, ४९५ कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून आला आहे. ५ फेब्रुवारी २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाकडून एनडीव्हीआयचे निकष तपासण्यासाठी तो जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्याकडून तो आल्यावर मदत करण्यात येईल. तसेच फळबागांच्या नुकसानीची भरपाई केली जाणार आहे.

Tags:    

Similar News