गवतात पिकवलेल्या सिताफळाला मिळतोय भाव
चोपड्यात गवतात पिकवलेल्या सीताफळाला नागरिकांची चांगलीच मागणी;
चोपडा तालुक्यातील लासुर येथील सीताफळाच्या मळ्यातील कच्चे सीताफळ तोडून गवतामध्ये पिकवले जात आहेत. त्यामध्ये कुठलेस केमिकल वगैरे न टाकल्यामुळे फक्त गवतात पिकवले जात असल्याने या सीताफळांना जास्त मागणी मिळत आहे. चोपडा शहरातील युवक हा मळा विकत घेऊन स्वतः गवतामध्ये पिकवत आहे व स्वतः विक्री करत असल्याने सीताफळाचा माल पाहून 70, 80 रुपये ते शंभर रुपये पर्यंत भाव मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगतले आहे.