शेतकऱ्यांच्या शेतात कॅलनचे पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे नुकसान...
दरवर्षी कॅनल फुटण्याचे किंवा त्यांची पाईपलाईन फुटण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र याकेड प्रशासन दरवेळी दुर्लक्ष करते आणि याचा फटका कॅनलच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. कॅनल फुटाला किंवा पाईपलाईन फुटली तर त्यांचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाते आणि शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होते.
वर्धा जिल्ह्यातील चाणकी गावातील शेतकऱ्यांनी शेतामध्ये तीन एकर परिसरात चनाची लागवड केली होती. शेती लगत असलेल्या कॅनलचे पाईप फूटल्यामूळे याचे थेट पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांच्या चण्यामध्ये सर्व पाणी जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कारण कॅनलचे पाईप फुटले होते. याबाबत लघु पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा केली आहे. मात्र प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. संबंधित विभागाने लक्ष दिले नाही तर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. शेतकऱ्यांचा तीन एकरातील संपूर्ण चना कॅनलच्या पाण्यामुळे भिजल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या या लाखो रुपयांच्या नुकसानीची भरपाई प्रशासन कशापद्धतीने करुन देणार हा खरा प्रश्न आहे. याबाबत संबंधित विभागाकडे शेतकरी नामदेव भोयर यांनी सदर तक्रार केली आहे. नुकसान भरापाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र प्रशासन हातावर हात ठेवून ढिम्म बसून आहेत. तर दुसरीकडे शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे.