मागील वर्षी कापूस उत्पादकांना प्रति क्विंटल मालाला चांगला भाव मिळाला होता. यावेळी देखील कापसाचा हंगाम चांगला जाणार असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे. त्यात जागतिक बाजारपेठेत अमेरिका , चीन, बांगलादेश या देशात कापसाचा तुटवडा आहे. याचाच फायदा भारताला होऊ शकतो. तसेच भारतीय बाजार पेठेत यंदा अखेर पर्यंत कापसाचा भाव काय असणार आहे यावर प्रश्नचिन्ह आहे. शिवाय जागतिक पातळीवर कापसाचा उठाव कसा असेल? जिनिंग आणि प्रेसिंग कसं असेल? याबाबत आंतराष्ट्रीय कापूस बाजाराचे जाणकार तसेच खान्देश कापूस असोसिएशन्स कडून मॅक्स महाराष्ट्रचे स्पेशल करस्पॉन्डेंट संतोष सोनवणे यांनी कापसाचं अर्थकारण जाणून घेतलं. पहा मॅक्स महाराष्ट्रचा हा विशेष रिपोर्ट...