पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षात सतत शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. अशा परिस्थितीत सुलतानी संकट काय कमी नाहीत. यंदा पावसाने सोयाबीन, कापूस, ज्वारी, बाजरी, डाळींब, केळी या सारख्या सर्वच पिकाचं मोठं नुकसान केलं आहे. मात्र, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना. अशी परिस्थिती कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे.
पावसाने कापूस भिजल्यानं कापसाची आद्रता वाढली आहे. केंद्रीय कापूस मंडळ किंवा फेडरेशन १२ टक्क्यांपेक्षा कमी आद्रतेचाच कापूस खरेदी करते. यंदा पावसामुळं आद्रता अधिक असल्यास कापूस नाकारला जातो आहे. त्यामुळं शेतकरी मोठा अडचणी सापडला आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारनं आधार देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात साधारण पणे दसऱ्याला कापूस खरेदीला सुरुवात होते. यंदा सरकारने कापसाला हमीभाव ५ हजार ८२५ रुपये असून शेतकऱ्यांना कापसाला हा दर मिळणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी बातचित केली... जागतिक बाजारात कापसाचे दर, रुईचे दर हे कापसाचा दर निश्चित करतात. काय आहेत जागतिक बाजारात कापसाचे दर? महाराष्ट्रातील कापसाला भाव मिळण्यासाठी सरकारने काय करायला हवे? या संदर्भात शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलेले मार्गदर्शन नक्की पाहा...