गेल्या वर्षीच्या कापूस हंगामात सुरवातीला कापसाला चांगला भाव मिळाला मात्र पुन्हा भाव वाढतील या आशेवर शेतकऱ्यांनी कापुसच विक्रीला काढला नाही. नंतर मात्र कापसाचे भाव 7,500 वर गेलेच नाही.यंदाही कापसासाठी गेल्या वर्षच्या तुलनेत आणखीन भाव खाली आलेत. कापूस बाजारात मंदीचं सावट असल्याच जानकरांच मत आहे.
दिवाळीची लगबग संपल्यानंतर नंतर शेतकऱ्यांनी शिवारातील कापूस वेचणीला पुन्हा एकदा वेग आला असला तरी काही भागात नियमितपणे सुरू असलेली कापसाची आवक काही प्रमाणात मंदावली आहे. पाहिजे त्या प्रमाणात कापसाची आवक विक्रीसाठी येत नसल्याने बाजार समित्यांमधील गजबज नाही. कापसाची हवी तशी आवक नसल्याने निरुत्साह असल्याच व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
राज्यातील बाजार समित्यात कापूस भाव
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात विविध बाजार समित्यामध्ये कमी अधिक प्रमाणात कापसाचे भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत जळगाव जिल्ह्यात 7,100 ते 7,200 मिळत आहे. कापसाचे आगार असलेल्या विदर्भातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काल पर्यंत कापसाची सुमारे 3,327 क्विंटल आवक झाली. पैकी नागपुरात स्थानिक कापसाची सर्वाधिक 1633 क्विंटल आवक झाली आणि त्यास 7000 ते 7211 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यवतमाळ बाजार समितीत एच-4 मध्यम धागा कापसाची 1094 क्विंटल आवक झाली, त्यास 6950 ते 7200 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चंद्रपुरमध्ये स्थानिक कापसाची 400 क्विंटल आवक झाली, त्यास 7050 ते 7325 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. वर्धा येथील बाजार समितीत लांब धागा कापसाची 200 क्विंटल आवक झाली, त्यास 7200 ते 7250 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. एकूण स्थिती लक्षात घेता चंद्रपुरात कापसाला सर्वाधिक 7325 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला आहे.