कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

Update: 2023-08-25 13:30 GMT

आधीच पाऊस नाही अन् त्यात धुळे तालुका परिसरात कपाशीवर लाल्या व मर रोग पडू लागल्याने काही शेतकऱ्यांनी कपाशी उपटून फेकून दिली आहे. तर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

धुळे तालुक्यात लाल्याचा प्रादुर्भाव धुळे तालुक्यातील शेतात शेतकऱ्यांच्या कपाशीवर लाल्या सदृश्य आजाराची लागण झाली आहे त्यामुळे शेतकरी चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने कसेबसे विहिरीच्या पाण्यावर कपाशी वाढवली मात्र, आता लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून झाडांची पाने लाल पडली असून त्यांची वाढ खुंटली आहे. त्याचबरोबर त्यांना कैऱ्या लागण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे त्यामुळे उत्पन्नात घट येणार असून केलेला खर्च आणि जाण्याची शक्यता आहे पंचनामे करून मिळावी अशी अपेक्षा शेतकरी तुकाराम पाटील यांनी व्यक्त केली आहे.


Full View




Tags:    

Similar News