देशभरात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात असल्याचे चित्र आहे. संततधार अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असून त्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. पावसामुळे यापूर्वीच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले होते. त्यानंतर तिसर्यांदा पेरणी केली मात्र गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला व पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा मॅक्स महाराष्ट्र ने घेतलेला हा आढावा...