एमएसपी समितीची बैठक, काय घडलं बैठकीत

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून केंद्रीय एमएसपी समितीची बैठक, बैठकीला संयुक्त किसान मोर्चा अनुपस्थित;

Update: 2022-08-22 12:34 GMT

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एमएसपी समितीची बैठक आज राजधानी दिल्लीमध्ये पार पडली. ही बैठक पार पडत असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संयुक्त किसान मोर्चाचं दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर महापंचायत सुरु होती. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा म्हणून एमएसपी कायदा करावा. अशी मागणी करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने दिल्लीत मोठं आंदोलन केलं होतं. मात्र, या समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळं शेतकरी संघटना आणि सरकार पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.

केंद्र सरकारने एमएसपी समिती नेमली आहे. या समितीचं अध्यक्षपद माजी कृषी सचिव संजय अग्रवाल यांच्याकडे दिलं आहे. या समितीत 26 सदस्य आहेत.

कोण होतं उपस्थित...

भारतीय आर्थिक विकास संस्थेचे कृषी-अर्थशास्त्रज्ञ सीएससी शेखर यांच्यासह आयआयएम-अहमदाबादचे सुखपाल सिंग, कृषी खर्च आणि कृषी आयोगाचे (CACP) वरिष्ठ सदस्य नवीन पी सिंह आज झालेल्या बैठकीला उपस्थित होते. तर शेतकऱ्यांच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार विजेते किसान भारत भूषण त्यागी, गुणवंत पाटील, कृष्णवीर चौधरी, प्रमोद कुमार चौधरी, गुनी प्रकाश आणि सय्यद पाशा पटेल सहभागी झाले होते.

आज पार पडलेल्या समितीत काय चर्चा झाली.

झिरो बजेट आधारित शेतीला प्रोत्साहन देणे

देशाच्या गरजा लक्षात घेऊन पीक पद्धतीत बदल करणे

एमएसपी अधिक प्रभावी करणे

Committee on MSP holds broad discussion on key issues in first meeting but SKM skips

Tags:    

Similar News