Dairy दुग्ध व्यवसायात व्यावसायिक दृष्टिकोन आवश्यक

देशातील आर्थिक विकासामध्ये शेतीचे योगदान हे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासातील असून आगामी काळात व्यावसायिक दृष्टिकोन अंगीकारून देशाच्या विकासाबरोबरच आर्थिक उन्नती साधण्याची आवाहन करण्यात आले आहे.;

Update: 2023-09-08 06:59 GMT

आर्थिक विकासामध्ये शेतीचे योगदान हे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासातील असून आगामी काळात व्यावसायिक दृष्टिकोन अंगीकारून देशाच्या विकासाबरोबरच आर्थिक उन्नती साधण्याची आवाहन करण्यात आले आहे.महावीर जंगटे यांनी दुग्ध व्यवसायातील संधी व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. तसेच डेअरी व्यवसायत युवकांना अमाप संधी असल्याचे त्यांनी सांगितले .

डॉ. सोमनाथ माने, प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, पुणे यांनी देशी गाईंचे संवर्धन, दुग्ध व्यवसायात असणाऱ्या अडचणी आणि संधी या विषयावर मार्गदर्शन केले. तेजोमय घाडगे यांनी विविध शासकीय योजनांची माहिती तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणार्‍या बाबींवर सखोल मार्गदर्शन केले ,तर श्रीमती. अनुजा लोखंडे मॅडम यूनियन बॅंक मॅनेजर यांनी उद्योग उभारणीसाठी प्रकल्प, बँकेकडून अर्थसहाय्य, प्रकल्प मंजुरी प्रक्रिया यावर मार्गदर्शन केले.

डॉ. धीरज कणखरे, प्राध्यापक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे यांनी दुग्धजन्य पदार्थ (पनीर, लस्सी, खवा, पेढा, आईस्क्रीम आणि तूप इ.) निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले आणि दुधातील भेसळ ओळखण्याचे तंत्रज्ञान शिकविले.

अशा प्रकारच्या कार्यशाळा झाल्यास उद्योग उभारणीसाठी अर्थसहाय्य व तांत्रिक मार्गदर्शन मिळेल असे मत व्यक्त शेतकरी उद्योजक प्रशांत शिळीमकर यांनी व्यक्त केले तसेच दुग्ध व्यवसायातील संधी शोधून हा व्यवसाय गटशेतीसारखा एकत्रित केल्यास यातून स्वतःचा ब्रँड करून योग्य मार्केटिंग केल्यास चांगला फायदा होईल असे मत उद्योजक रविंद्र लाड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संयोजन व आभार प्रदर्शन डॉ. सुनील अडांगळे यांनी केले.

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र पशुसंवर्धन व दुग्धशास्त्री विभाग कृषी महाविद्यालय पुणे आणि तेज इंडस्ट्रीज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व्यावसायिक प्रशिक्षण संपन्न झाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुनील मासाळकर सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय, पुणे आणि प्रमुख पाहुणे म्हणुन महावीर जंगटे राज्य समन्वयक भूजल आयुक्तालय , हे पुणे उपस्थित होते. याप्रसंगी तेजोमय घाडगे, संचालक, तेज इंडस्ट्रीज, पुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेज इंडस्ट्रीज पुणे , अनुराधा दबडे जिल्हा संसाधन व्यक्ती PMFME योजना आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाअंतर्गत अनुभवात्मक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Tags:dairy farming in maharashtra,dairy farming sucess story in maharashtra,hf cow dairy farm in maharashtra,dairy farm,maharashtra,hf cow sale in maharashtra,maharashtra dairy,great maharashtra,dairy farm business,buffalo dairy farm in maharshtra,dairy farming in india,murrah buffalo dairy farm,dairy farming,dairy farm in maharashtra,buffalo dairy farm,desi cow dairy farm in maharashtra,buffalo farm maharashtra,dairy farming chara niyojan

Tags:    

Similar News