Monsoon2023आठवडाभर राज्यात पावसाचा जोर ओसरणार
आगामी आठवड्यात कोकणपट्टीसह विदर्भात विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा (Monsoon) इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होई, अशी शक्यता आहे. प्रादेशिक पूर्वानुमानुसार बुधवारपर्यंतच्या पाच दिवसांमध्ये कोकण विभागामध्ये सर्वदूर पाऊस असेल तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक किंवा क्वचित ठिकाणीच पावसाची शक्यता वर्तवली आहे.;
आणखी वाचा -पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 8 जुलैपर्यंत जोरदार पाऊस
पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियावरून दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये कोकणातील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या काळात मध्यम सरी पडतील. शनिवारी प्रादेशिक हवामान विभागाने जारी केलेल्या पूर्वानुमानुसार रविवारनंतर पालघर, ठाणे जिल्ह्यासह मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. तर सोमवारनंतर दक्षिण कोकण म्हणजे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पावसाचा जोरही कमी होऊ शकतो.
मुंबई शहर, सातारा, सांगली, हिंगोली, अमरावती, अकोला, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची तूट आहे. पुणे, नंदूरबार आणि वर्धा येथे पाऊस सरासरीच्या श्रेणीत आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात विदर्भवगळता बहुतांश ठिकाणी समाधानकारक पाऊस असल्याचे दिसत आहे. मात्र अजूनही शेतकरी हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे सांगत आहेत. विदर्भामध्ये मोठ्या पावसाची अजूनही गरज असल्याचे आकडीवरून स्पष्ट होत आहे.
कोकणामध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात ८० टक्के, मध्य महाराष्ट्रात ३० टक्के, मराठवाड्यात ७९ टक्के अतिरिक्त तर विदर्भात १६ टक्के पावसाची तूट आहे. कोकण आणि मराठवाड्यात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने जुलै पहिल्या आठवड्यातील पावसाची सरासरी अतिरिक्त झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, यवतमाळ येथे आठवड्याच्या सरासरीच्या तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात येत्या आठवड्यात पावसाचा जोर फारसा नसेल, अशी शक्यता आहे. प्रादेशिक पूर्वानुमानुसार बुधवारपर्यंतच्या पाच दिवसांमध्ये कोकण विभागामध्ये सर्वदूर पाऊस असेल तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक किंवा क्वचित ठिकाणीच पावसाची शक्यता आहे.
विजय जायभावे यांनी MaxKisan साठी वर्तवलेला हवामान अंदाज
ता. सिन्नर जि. नाशिक दि. 9 जुलै 2023
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈
1
राज्यात या आठवड्यात पाऊस कमी
"पुढील पाच सहा दिवस काही भागात किरकोळ मध्यम पाऊस होईल.कमी दाब उत्तरेकडे सरकला असल्यामुळे आणि सध्या समुद्रावर कमी दाब निर्माण झालेला नसल्याने पाऊसात घट असेल"
2
"13/14 जुलै पूर्व विदर्भ काही भागात पाऊसात वाढ होईल.पुढे पुन्हा एक कमी दाब निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण राहणार असल्यामुळे 18/19 जुलै नंत्तर पाऊसात वाढ होण्याची शक्यता आहे."
3
"12/13 जुलै नंत्तर बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे राज्यात काही भागात पुन्हा 15/16 /17 पाऊस वाढेल. जुलै च्या शेवटी तीव्र कमी कमी दाबाचा पट्टा (WML ) निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राज्यात मध्य भागात तीव्र पाऊस देखील होईल".
4
"जुलै मध्ये कमी दाब उपसागरावर निर्माण होत राहून पावसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि ऑगस्ट एल निनो तीव्र होणार असला तरी हिंदी महासागरावर IOD देखिल जुलै पासून पॉजिटीव्ह होणार असल्यामुळे या काळात पावसाचा जोर वाढणार आहे"
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
5
उत्तर महाराष्ट्र 9 जुलै
जळगाव, धुळे, नंदुरबार,नाशिक,छत्रपती संभाजी नगर ,अहमदनगर,काही भागात मध्यम पाऊस होईल.जळगाव संभाजी नगर अहमदनगर नाशिक भागात पाऊस जळगाव धुळे संपूर्ण नाशिक अहमदनगर,धुळे ,नंदुरबार सर्वत्र 10/11/12/13 जुलै पर्यंत किरकोळ मध्यम पाऊस पडेल. 16/17 जुलै नंतर हळूहळू पाऊसात वाढ होण्याची शक्यता आहे .
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
6
कोकण 9 जुलै
सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई पालघर पासून काही भागात कमी अधिक पाऊस पाऊस होईल.14/15 16/17 जुलै पाऊस होईल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
7
मध्य महाराष्ट्र 9 जुलै
पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली पुढील दोन दिवस पाऊस पडेल. तसेच 9 जुलै या भागात काही ठिकाणी पाऊस होईल.15/16 जुलै पाऊस या भागात देखील वाढेल.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
8
मराठवाडा 9 जुलै
पुढील दोन दिवस लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना बीड धाराशीव ढगाळ वातावरण राहून किरकोळ सरी काही भागात होतील. 15/16 जुलै पर्यंत काही भागात किरकोळ राहील .19/20 जुलै नंतर काही भागात पाऊस वाढलेला राहील.
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
9
विदर्भ 9 जुलै
पूर्व विदर्भ नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती, अकोला बुलढाना, वाशीम काही ठिकाणी पाऊस होईल 14/15 जुलै विदर्भात पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.