मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साखर कारखानदारांच्या ताटाखालचे मांजर - राजू शेट्टी
मुख्यमंत्र्यांना आम्ही कर्तृत्ववान समजत होतो. एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात शासन निर्णय व्हावा यासाठी अनेकवेळा त्यांचे उंबरे झिजवले मात्र अद्याप याबाबत शासन निर्णय नाही.जे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कारखानदारांच्या मनात असेल तेच राज्याचे धोरण असणार. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस त्याला फक्त म म म्हणणार.या मंत्री समितीच्या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही.आम्हाला प्रतिटन दुसरा हप्ता 400 रुपये हवा.आणि तो आम्ही मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा माझी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.