मिरची 'लागली' तरी शेतक-यांची आस सुटेना
मिरचीच नाही तर सर्वच शेतीपिकांचे भाव सध्या गडगडले आहेत..;
सध्या वातावरणातील बदल पाहता पाऊस नाही पाणी कमी शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान होत आहे. अशाच परिस्थितीमध्ये ग्रामीण भागामध्ये सध्या मिरची लागवड सुरू आहे. मिरचीच नाही तर सर्वच शेतीपिकांचे भाव सध्या गडगडले आहेत. त्यातच कमी पावसामध्ये कमी पाण्यामध्ये सध्या शेतकरी आता मिरची लागवड करत आहेत. पुढच्या आशेमुळे की कुठेतरी उत्पन्न चांगलं होईल असे समजून. मिरचीला एकरी 70 हजार रुपये खर्च सध्या आहे. तरीही ही लागवड चालू आहे. यातून उत्पन्नाची आशाच नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी भगवान रंगनाथ दौंड यांनी दिली आहे.