मिरचीला मिळतोय कवडीमोल भाव..
शेतमालाच्या भावाची दुर्दशा थांबायला तयार नाही.. कांद्याच्या पडझडीनंतर आता भाजीपाला देखील प्रभावित झाला असून मिरची उत्पादक यांचा अक्षरशः वाताहत झाली आहे. हमीभाव सोडा परंतु उत्पादन खर्च देखील मिळणं मुश्किल झालं आहे पहा नाशिक मधून आलेला MaxKisan चा ग्राउंड रिपोर्ट..
लाखो रुपये खर्च करून मिरचीला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने अक्षरशः मिरची उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील वेळापूर येथील शेतकरी एकनाथ कुटे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये आरमार जातीच्या मिरचीची लागवड केली होती. त्याकरीता त्यांनी सात ते साडेसात हजार रुपये खर्च करुन त्यांना मल्चिंग पेपर व बांबू यासह रासायनिक खते असा एकूण दोन ते अडीच लाख रुपये त्यांना उत्पादनासाठी खर्च आला होता. मात्र ज्यावेळेस मिरची निघण्यास सुरुवात झाली तेव्हा मिरचीला बाजारात 15 ते 20 रुपये भाव मिळू लागल्याने अक्षरशः या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करत आहे.