'रब्बी'च्या हंगामात केंद्रीय पथक करणार 'खरिपा'ची पाहणी; केंद्र सरकारचे 'वरातीमागून घोडे'

Update: 2020-12-16 04:01 GMT

औरंगाबाद : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. जवळपास मराठवाड्यातील 26 लाख हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. आता या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक 20 आणि 21 डिसेंबर रोजी मराठवाड्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाचा हा पाहणी दौरा म्हणजे 'वरातीमागून घोडे' असच म्हणावं लागेल.

मराठवाड्यात यावर्षी पावसाने अपेक्षा पेक्षा अधिक हजेरी लावली. यामुळे कापूस, सोयाबीन, भुईमूग, तूर याचं मोठं नुकसान झालं. त्यांनतर राज्य सरकारने मदतीची घोषणा केली खरी मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाला नाही.त्यात आता केंद्रीय पथक पाहण्यासाठी येणार आहे. खरीप जाऊन शेतकऱ्यांनी आता रब्बीची पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे केंद्रीय पथक पाहणी करणार काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

मराठवाड्यात एकूण 36 लाख शेतकरी बाधित असून त्यांना 2600 कोटी रुपयांची मदत अपेक्षित असल्याचा अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाकडे पाठवला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 1336 कोटी रुपयांचे अनुदान शासनाने पाठीवला आहे.

'रब्बी'च्या हंगामात केंद्रीय पथक करणार 'खरिपा'ची पाहणी; केंद्र सरकारचे 'वरातीमागून घोडे'

शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पण प्रत्यक्षात मात्र अजूनही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही.त्यामुळे दिवाळीसारखा सणही शेतकऱ्यांना कडू ठरला. त्यात अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे.राज्याची मदत अजून मिळाली नाही त्यामुळे केंद्राची मदत कधी मिळणार हा शेतकऱ्यांसाठी कोड आहे.

Tags:    

Similar News