कोरोनाच्या संकटात दिल्लीच्या सिंघू सीमेवर गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन आजही सुरू आहे. कृषी सुधारणा विधेयकांवर न सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरू असताना बिगर भाजपशासित राज्यांमध्ये केंद्राच्या कायद्यांना निष्प्रभ करणारे कायदे आणले गेले.नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधीमंडळाचा पावसाळी अधिवेशनात तीन कृषी कायदे मांडले गेले? या कायद्यातून खरंच केंद्राच्या कायद्यांना विरोध होतोय का? शेतकऱ्यांचा फायदा आहे की तोटा? शेतकरी कायद्यांवरुन निर्माण झालेला तिढा कसा सुटणार?
शेतकरी संघटना पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत का? सगळ्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले आणि कृषी पत्रकार रमेश जाधव यांच्यासोबत... नक्की पहा मॅक्स महाराष्ट्रावर..