भारत आणि कॅनडा मध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम शेतमालाच्या आयात निर्यातीवर झाला असून आगामी काळात हा संघर्ष आणखी चिघळला तर त्याचे दुरगामी परिणाम होतील.गेल्या वर्षीची एक लाख टन मसूर आयात यंदा चार लाख टनांवर असून गरज भागवण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि रशिया मधून मसुर आयात शक्य आहे.भारताची कोळंबी,बासमती भात, तुरडाळ निर्यात प्रभावित होत असून कॅनडा भारत संघर्ष दीर्घकाळ योग्य नाही. साखरेच्या उत्पादनावर इथेनॉल परिणाम निश्चित होणार असून बांगलादेश सारख्या शेजारील देशांमध्ये होणारी साखरेची तस्करी रोखता येईल.साखर निर्यातीबरोबर बंधनाची शक्यता असल्याचे आयग्रेन इंडियाचे संचालक राहुल चौहान यांनी मॅक्सकिसन शी बोलताना सांगितलं.