Cabinet Meeting । शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत कोनते निर्णय घेण्यात आले ?
Cabinet Meeting । अस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने (unseasonal rain) हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. याच संदर्भात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली.;
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय –
• अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार।
• झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा.
शेतकर्यांना तातडीने मिळणार मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नुकसान झालेल्या ठिकाणी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत केली जाईल. एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास एक लाख हेक्टर वर पिकांचे नुकसान झाले आहे.
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामातही पावसाने काही भागात पाठ फिरवली. त्यात आता रब्बी हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. याबाबत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.
शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार मिळणार मदत
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार करून त्यांना तातडीने योग्य ती मदत केली जाईल, असे या बैठकीत सांगितले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या नियमानुसार मदत मिळेल, असेही बैठकीत सांगितले.
ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे तेथील पंचनामे करुन शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अगोदर सर्व पंचनामे होतील, त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. एकूण १८ जिल्ह्यातील शेतीचे नुकसान झालं आहे. लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.