बीआरएस लोकसभा विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविणार

आगामी काळात महाराष्ट्रात लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेसह अन्य सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लढविणार असल्याची घोषणा भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माणिक कदम यांनी पत्रकार परिषदेत केली़.;

Update: 2023-06-05 12:28 GMT

एक जून पासून राज्यातील २८८ मतदार संघात प्रचार प्रसार सुरू करण्यात आला.असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत कदम बोलत होते़ यावेळी भारत राष्ट्र समितीचे बीआरएसचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बी़जे़देशमुख, पुणे जिल्हा समन्वयक राहूल काळभोर आदी उपस्थित होते़.

माणिकराव कदम म्हणाले की, भारतात पहिल्यांदा पार्टीची डिजिटल नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे़ पाच दिवसात १ लाख ८८ लोकांनी नोंदणी केली आहे़.बीआरएस मुळे तेलंगणातील ९९ टक्के शेतकरी आत्महत्या थांबल्या आहेत. पेरणीसाठी सरकारकडून दहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे़ शेतकºयाच्या कुटुंबातील सदस्याचा मृत्यु झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत पाच लाख रुपये दिले जातात़ यासह अन्य सुविधाही शासनाने दिल्या आहेत़ शेतकºयांसह सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यास आम्ही कटिबध्द आहोत़ राज्यातील जनतेचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे़ महाराष्ट्रात निवडणूकांमध्ये यश मिळेल आणि संभाजीनगरमधून के़ चंद्रशेखर राव निवडणूका लढू शकतात असेही कदम यांनी सांगितले़.

पक्षासाठी पुण्यात एक एकर जागेत कार्यालय सुरू करण्यात येणार आहे़. बी़जे़ देशमुख म्हणाले की, गेल्या चार पाच दिवसांपासून एक जून पासून राज्यातील २८८ मतदार संघात प्रचार प्रसार सुरू असून पक्षाची धेय्य धोरणे समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे़ तेलंगणा  राज्याची निर्मिती तेव्हा २०१४ तीन तास वीज मिळत होती. ती सद्यस्थितीत शेतकºयांना २४ तास वीज मोफत दिली जात आहे़ आठ वर्षात ८४ हजार कोटी रुपये खर्च करून नद्या जोड माध्यमातून शेतकºयांसाठी पाणी उपलब्ध करुन दिले़पेरणीसाठी शेतकºयांना दहा हजार रुपये अनुदान दिले जात आहे़. पीकविमाही सरकारने काढला आहे़ तसेच उत्पादन जास्त झाल्यास हमीभावाने शेतमालाची खरेदीही तेलंगणा सरकार करत आहे़ २०१८ पासून शेतकरी आत्महत्या शून्यावर आली. महाराष्ट्रापेक्षा तेलंगणा राज्य मागास होते ते विकास करु शकते तर महाराष्ट्रात का होवू शकत नाही असा सवाल करत राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे देशमुख यांनी सांगितले़ सद्यस्थितीत पक्षाचे २८८ मतदार संघात जागृती अभियान सुरू आहे.

Tags:    

Similar News