जलयुक्त शिवार घोटाळा: फास आवळण्यास सुरवात

सोमवारपासून सुरु होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी आधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार घोटाळ्याचा दणका महाविकास आघाडीनं घेतला आहे. या प्रकरणात आता दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबणाची सुरवात झाल्यानं भाजपचे धाबे दणाणले आहेत....;

Update: 2020-12-11 11:45 GMT

नुकतेच निलंबित करण्यात आलेल्या दोन अधिकाऱ्यांमध्ये अंबाजोगाई आणि बीड उपविभागीत कृषी अधिकारी व्ही. एम. मिसाळ आणि तालुका कृषी अधिकारी बी. बी. बांगर यांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार घोटाळ्यात आतापर्यंत 32 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 167 गुत्तेदार मजूर संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे त्यांच्याकडून वसुलीही करण्यात येणार आहे. माजी कृषी सचिव बिजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारने यापूर्वी जलयुक्त शिवाराची खुली चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Full View


Tags:    

Similar News