पारंपारिक शेतीला फाटा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली मोसंबी लागवड....!
सतत दु्ष्काळी परीस्थितीचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात शेतीचे नवनवे प्रयोग होत असून कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे फळझाड मोसंबीची लागवड यशस्वी झाली आहे. दुष्काळग्रस्त जिल्ह्यात आता फळबाग लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला प्रतिनिधी हरिदास तावरेंचा ग्राऊंड रिपोर्ट;
बीड जिल्हा म्हटलं कधी ओला दुष्काळ तर कधी सुखा दुष्काळ याच दुष्काळामुळे बीड जिल्ह्यातील अनेक शेतकरी आत्महत्या करताना आपण पाहिले आहेत आत्महत्या केल्यामुळे त्या शेतकऱ्याची कुटुंबही उघड्यावर पडली आहेत याच बीड जिल्ह्यात एका शेतकऱ्यांना आदर्श निर्माण करण्यासाठी मोसंबी लागवड केली आहे महाराष्ट्राला फळांचा तबक म्हणून ओळखला जातो तर याच राज्यात अनेक जिल्ह्यांनी आपले नाव राज्यासह देशाच्या पटलावर नेऊन ठेवले आहे त्यामध्ये फळबाग लागवड केली आहे व त्यापासून शेतकरी लाखोचे उत्पन्न घेत आहे त्यामध्ये घोलवडचा - चिकू ,सोलापूरचे- डाळिंब ,नागपूरचा - संत्रा रत्नागिरीचा - हापूस सासवडचा- अंजीर औरंगाबाद आणि जालना ची -मोसंबी ,कोकणचा -आंबा नाशिकचे -द्राक्षे आणि जळगावची -केळी यामुळे या जिल्ह्यांनी आपली स्वतःची प्रगती तर केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या राहणीमाना बरोबरच आर्थिक प्रगतीही मोठ्या प्रमाणात झाली आहे...
बीड जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकऱ्यांनी आपल्या पीक पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल केलेला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख मात्र याच बीड जिल्ह्यात यावर्षी ऊस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि याच ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आल्यास चित्र आपण यावर्षी पाहिला आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यात जवळपास 1 हजार हेक्टर च्या आसपास मोसंबी लागवड झालेली आहे ज्या भागांमध्ये पाण्याचे प्रमाण बर्यापैकी आहे त्या भागात फळबाग लागवडीकडे शेतकरी वळला आहे...
गेल्या काही वर्षापासून आम्ही पारंपारिक शेती करत होतो या शेतीमध्ये कापूस लागवड करायचो कापूस लागवड केल्यानंतर त्याच्यावर बोंड आळी लाल या सारख्या रोगांना कापूस वायाला जायचा आमच्याच भागातील प्रगतशील शेतकरी जगन्नाथ आर्सुळ साक्षाळ पिंपरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या कष्टाने भरपूर उत्पन्न मिळत आहे मागच्या तीन वर्षाचा पासून आम्ही मोसंबी फळ धरले आहे आता जवळपास हे पाच वर्ष संपले आहेत पाचव्या वर्षीचा मृग बहार आहे सध्याच्या काळामध्ये पाणी भरपूर आहे मागच्या वर्षी आम्हाला आंबे बहार कमी लागल्यामुळे आम्ही मृग बहार धरला आहे.
सध्या आमच्याकडे (400 )झाडे आहेत सरासरी (30) टन माल निघायला पाहिजे सध्याचा भाव (38)अडोतीस रुपये प्रति किलो प्रमाणे मिळाला आहे (30)टनाच्या पुढे जो माल निघेल त्याचा भाव वेगळा असेल मी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान करत आहे की, आपल्याकडे जर 4-5 एक्कर जमीन आहे त्याच्यामधली अर्धी जमीन ही मोसंबी लागवड साठी ठेवा व त्याची लागवड करा कारण मोसंबी हे फळ पीक शेतकऱ्यांना उभं करणार पीक आहे आत्तापर्यंत बरेच शेतकरी खालोखालच आहेत मोसंबीतून जे उत्पन्न निघत आहे.
ते एक नंबरचा उत्पन्न आहे मोसंबीला खर्चसुद्धा कमी आहे लोक काहीही सांगतात मोसंबीला पाणी सुद्धा कमी लागत आहे ज्या शेतकऱ्याकडे विहिरीवर उन्हाळ्यामध्ये एक तास मोटर चालेल एवढं जरी पाणी असलं तरी चारशे झाड त्यावर जोपासू शकतात त्या (400)चारशे झाडापासून त्याला कमीत कमी पाच लाख रुपये वर्षाला मिळते कुठल्याही शेतकऱ्याला माझे एक आव्हान आहे की दुसर्या पिकाच्या मागे लागू नये मोसंबी पिकाला खर्च कमी आहे याला शेणखत टाकले तर अति उत्तम आम्ही या वर्षी या पिकाला कारखान्याची उसाची मळी 20 टन टाकली होती माझे अडीच एकर क्षेत्र आहे त्यामध्ये 418 झाडे आहेत त्याला आपण मळी टाकली होती अति उत्तम व भरघोस उत्पन्न त्या मळी मूळे मला मिळाले आहे...
मोसंबी फळबाग जोपासण्यासाठी आम्हा शेतकऱ्याला एक लाख रुपये खर्च येतो तो कसा येतो फवारणी आली मजुरी आली खत आलं पण त्यामध्ये कारखान्यांची मळी टाकलेली आहे शेणखत टाकलेला आहे गवत काढणे खुरपं करणे असा मिळून एक लाख रुपये खर्च येतो खर्चाच्या मानाने व उत्पन्नाच्या मानाने झालेला खर्च हा अत्यंत कमी आहे सरासरी उत्पन्नाची दहा लाख रुपयापर्यंत अपेक्षा आहे यावर्षीचा आमचा मृग बहार आहे व हा पहिल्याच वेळेस धरला आहे आणि या परिसरातील हा मी नंबर 1 बाग आणला आहे असे रामदास भिकाजी कोळेकर यांनी सांगितले.
मागच्या चार पाच वर्षापूर्वी आम्ही ज्वारी बाजरी गहू असे पीक घेत होतो त्यामुळे त्याच्या मध्ये परवडत नव्हतं पण आता आम्ही मोसंबी लागवड केल्यामुळे आम्हाला आता परवडत आहे त्यामध्ये आता आम्हाला एक दीड लाख रुपये खर्च लागत आहे व त्यातून उत्पन्न नाही चांगला निघत आहे आता आमचा एक लाख रुपये खर्च झाला आहे मात्र त्यातून दहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे त्यामुळे आम्ही आता समाधानी आहोत त्यामध्ये आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च घर खर्च स्वागत आहे मात्र ज्वारी बाजरी कापूस या सारखी पिके घेतो होतो त्यावेळी आम्हाला वर्ष-वर्ष पैसा बघायला भेटत नव्हता यामधून आम्हाला पैसा दिसतो आम्हाला मुलांची शिक्षण होतात घरखर्च भागतोय... आम्ही शेतकऱ्यांना हेच सांगत सांगत आहोत की आपण ही बाकीचे पीक घ्या पण आपल्या शेतात एक तरी फळांची बाग लावा याच्यामध्ये चांगला परवडत आहे... असे -महिला शेतकरी मीना रामदास कोळेकर म्हणाल्या.
माझे वडील दरवर्षी पारंपरिक शेती करत होते त्याच्या मध्ये त्यांना काही परवडत नव्हतं त्याच्यामुळे ते सतत टेन्शनमध्ये असायची मात्र आता ही बाग लावल्यापासून याच्या पासून चांगले उत्पन्न निघत आहे वडिलांच्या चेहऱ्यावरील हसू पाहून मला फार आनंद होतो याअगोदर जे वडील घेत होते त्या वर त्यांचा जास्त खर्च होत असे व उत्पन्न कमी निघत असायचं त्यामुळे त्यांना चांगलं वाटत नसेल आणि आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत एकदा फळबाग लागवड केल्यानंतर त्याच्यातून पुन्हा पुन्हा उत्पन्न निघत आहे त्यामुळे तुम्ही फळबाग लागवड करा असं शेतकऱ्यांच्या मुलीनं सांगितलं.
मी परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करतो कि आपल्याकडे जर सहा एकर जमीन असेल तर त्यामधली कमीत कमी तीन एकर मोसंबी लागवड करावी इतर पिकाचा भरवसा राहिलेला नाही कारण अतिवृष्टी म्हणा किंवा मग कमी पाऊस म्हणा यामुळेही पीक येत नाहीत शेतकऱ्यांचं नुकसान होतं सरासरी तीन एकर जरी बाग लावली तरी त्यामध्ये सहाशे झाडे बसतात पंधरा बाय पंधरा वर जरी लागवड केली तरी साधारण त्याच्या पासून आपल्याला तिसऱ्या ते चौथ्या वर्षी उत्पन्नाला सुरवात होते साधारण चौथ्या वर्षी सर्व खर्च जाऊन दोन लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळू शकते आणि पाचव्या वर्षी पासून पुढे दहा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न तुम्हाला चालू होते त्यामुळे शेतकऱ्यांना या फळबाग लागवडीकडे वळावे अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो असं जगन्नाथ मुरलीधर आर्सुळ म्हणाले.