Baramati Agriculture Exhibition : एआयची करामत ; एकाच रोपाला बटाटा आणि टॉमेटो चं पीक

Artificial Intelligence : बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या जोरावर मोठी मजल मारली आहे. ज्यामुळे एका झाडातून बटाटे आणि टोमॅटोचे उत्पादन घेता येणार आहे.;

Update: 2024-01-21 16:02 GMT

सध्या देशाचे कृषी मंत्रालय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या जात आहेत. तर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी देशातील विविध कृषी विद्यापिठांत संशोधन केले जात आहे. सध्या बारामती कृषी प्रदर्शन चांगलच चर्चेत आले आहे आणि त्याचं कारण ठरलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलं जानारं संशोधन. बारामतीत सूरु असलेल्या या कृषी प्रदर्षणात टोमॅटोच्या झाडापासून बटाट्यांचे उत्पादन घेण्यात आले आहे. त्यामुळे




 


बारामती कृषी प्रदर्शन

बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले असून येथे थेट शेतीचे थेट प्रात्यक्षिक दाखवले जात आहे. या प्रदर्शनात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याच्या झाडांपासून टोमॅटोची लागवड केली आहे. त्यामुळे एकाच रोपातून बटाटे आणि टोमॅटोचे उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे.




 


वरती टोमॅटो आणि जमिनीत बटाटे

बारामती अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने टोमॅटोचे असे वान तयार केले आहे. ज्यामुळे वरती टोमॅटो आणि जमिनीत बटाटे येतील. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना बंपर उत्पन्न मिळेल असे बोलले जात आहे. तर या नव्या रोपाच्या जातीस शास्त्रज्ञांनी याला पोल्मॅटो असे नाव दिले आहे. तर असेच संशोधन भोपळमध्ये झाले होते. तेथे एकाच रोपातून टोमॅटोबरोबरच वांगी पिकवण्यात आली होती.




 


एआय तंत्रज्ञानाचा वापर

त्याचवेळी कृषी विज्ञान केंद्राचे तज्ज्ञ तुषार जाधव यांनी सांगितले की, बारामतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनेक पिकांवर काम केले जाते. वांग्याच्या पिकांवर टोमॅटोची लागवड जशी केली गेली त्याच तंत्राचा वापर करून टोमॅटोच्या झाडापासून बटाटा घेतला जात आहे. यासाठी कलम पद्धती विकसित केली गेली. ज्यामुळे शेतकरी हंगाम नसतानाही शेती करू शकतात. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे.

तसेच दोन पिके घेण्यासाठी त्यांना वेगळ्या जागेची आणि झाडांची गरज भासणार नाही असेही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.




 


उत्पादन कधी मिळणार

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतीसाठी वेगवेगळी तंत्रांचा वापर कसा करावा याचे प्रात्यक्षित दाखवण्यात येत आहे. ज्यात टोमॅटो कलमाद्वारे बटाट्याचे उत्पादन कसे घेता येईल हे दाखविण्यात आले आहे. एकाच झाडावर टोमॅटो आणि बटाट्याचे उत्पादन ४५ ते ६० दिवसांत सुरू होते.




 


बाल्कनी, टेरेस किंवा छतावर लावता येणारं झाड

विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने पर्यावरणानुसार पिकांना खत, पाणी दिली जातात. तुषार जाधव यांनी सांगितले की, ५० हजार रुपये खर्च करून शेतकरी ६ महिन्यांत दोन्ही पिकांमधून दीड लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकतो. एका रोपातून दोन किलो टोमॅटो आणि सुमारे १.२५ किलो बटाटे मिळू शकतात. तर ही रोपं किचन गार्डनिंग, घराच्या बाल्कनी, टेरेसवर किंवा छतावर कुंड्यामधून लावता येतात.





Tags:    

Similar News