शेतात टरबूज लागवड करून एक महिन्यानंतर केळीची लागवड

Update: 2023-10-13 02:30 GMT

जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केळीचे उत्पादन घेतले जात असल्याने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करून उत्पन्न घेत असतात. काही शेतकरी केळी पिकात आंतरपीक घेतात. परंतु चोपडा तालुक्यातील अकुल खेडा गावातील सुशिक्षित तरुण युवा शेतकरी यांनी आपल्या शेतात मल्चिंग पेपर वरती लागवड केली आहे. टरबूज लागवड करून एक महिना झाला आता शेतकरी त्यामध्ये मजुरांच्या साहाय्याने केळीच्या रोपांची लागवड करीत आहे. केळीचे पीक हे 11 महिन्याचे आहे तर टरबुजाच्या पिक हे 75 दिवसांमध्ये येणारे त्यामुळे टरबूज ला भाव चांगला मिळाला तर आपला जो लागलेला खर्च आहे तो संपूर्ण निघतो आणि केळीचे उत्पन्न ज्यावेळेस येतं त्यावेळेस संपूर्ण नफा हा आपल्याला मिळतो. पारंपारिक शेती न करता असे वेगवेगळे प्रयोग शेतकऱ्यांनी केले तर शेती नक्कीच फायद्याचे ठरते सुशिक्षित तरुण ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेतीत योग्य नियोजन केलं आणि वेळ दिला तर नोकरीपेक्षा जास्त वर्षाला आपण उत्पन्न घेऊ शकतो असे युवा शेतकरी प्रतीक पाटील यांनी सांगितले. 

Full View

Tags:    

Similar News