जळगावात केळीची पाने अंगाला बांधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन
सी एम व्ही आजारामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या बरोबरच पूरग्रस्तांना सुद्धा तातडीची मदत करावी यामागण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जळगावात अनोखे आंदोलन करण्यात आले.;
Header:
URL:
ANCHOR: सी एम व्ही आजारामुळे केळीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावे, त्यांना नुकसान भरपाई द्यावी, थकीत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी या बरोबरच पूरग्रस्तांना सुद्धा तातडीची मदत करावी यामागण्यासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटनेच्या वतीने जळगावात अनोखे आंदोलन करण्यात आले.
सी एम व्ही आजारामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केळीची अंगाला पाने बांधून, डोक्यावर केळीचा घड घेवून केळीचे खांब घेवून निषेध व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी केळीच्या पानावर मागण्या लिहण्यात आल्या. ते केळीचे पान जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे.