केळीला न्याय मिळालाच पाहिजे: आमदार शिरीष चौधरी
केळी पिक विमा आणि सी.एम व्ही.च्या नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री यांच्या कडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. शिरीष चौधरी यांनी सांगितले आहे...;
रावेर येथे दि. 4 ऑक्टोंबर रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात अंकलेश्वर - बुऱ्हाणपूर महामार्गावर केळी पीक विमा व सी.एम व्ही नुकसान भरपाईची रक्कम त्वरीत मिळावी यासाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. याबाबत आ.शिरीष चौधरी यांनी केळी पीक विमा आणि सी.एम व्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटुन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.