बांबू पासून तयार केलेली पारंपारिक झोपडी ठरतेय आकर्षणाचा केंद्रबिंदू
बांबू पासून तयार केलेली झोपडी व माती पासून तयार करण्यात आलेले भांडे हे प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू;
नंदुरबार शहरात खानदेश विभागीय कृषी महोत्सव सुरू असून या कृषी प्रदर्शनात पर्यावरण पूरक जीवनशैलीची खास झलक पाहायला मिळत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधव आजही बांबूपासून तयार करण्यात आलेल्या झोपडीत राहत आहेत. या पारंपारिक बांबूच्या घराची परंपरा टिकून राहावी यासाठी विशेष बांबूपासून आणि सागवान लाकडापासून तयार करण्यात आलेल्या झोपडीचं या ठिकाणी प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. आजही सातपुड्याच्या डोंगररांगात आदिवासी बांधव कशाप्रकारे बांबूपासून तयार केलेल्या झोपडीत राहतात व पारंपारिक माती पासून तयार केलेले भांडे आजही वापरतात याचे प्रदर्शन कृषी महोत्सव ठेवण्यात आले आहे. बांबू पासून तयार केलेली झोपडी व माती पासून तयार करण्यात आलेले भांडे हे प्रदर्शनात आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरत आहे.