असाही साजरा होतो बैलपोळा..
पारंपारिक पोळा सणाची धुमदाम सर्वत्र सुरू झाली असून ज्यांच्याकडे बैल नाहीत अशांसाठी कृत्रिम बैलांची खरेदीला वेग आला आहे..;
बैल पोळा सण दोन दिवसावर आल्याने पोळा सणासाठी लागणारे पुजेचे साहित्य आणि मातीची बैल जोडी बाजारात दाखल झाले आहे. परंतु आता पीओपी च्या बैलजोडीचे आकर्षण वाढल्याने मातीचे बैल जोडी ची मागणी कमी झाली आहे. व पीओपी च्या बैल जोडीची मागणी वाढली आहे. बैलपोळा सणसाठी लागणाऱ्या बैल जोडी बनवण्यासाठी एक ते दोन महिन्यापासून संपूर्ण कुटुंब कामाला लागत असतं आणि हा व्यवसाय फक्त दोन ते तीन दिवसांचा आहे. यावर्षी भाव वाढीमध्ये काही फरक नाही 30 रुपये पासून पुढे मातीचे व पीओपीची बैलजोडी विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे विक्रेते आबा आणि दीपक कुंभार यांनी सांगितले..