हिमाचलचा सफरचंद एपीएमसी बाजारात दाखल ; राज्यातील सफरचंदाला पावसाचा फटका
हिमाचल मधून येणाऱ्या सफरचंदाला मागणी असून किलोला 150 ते 160 रुपये दर सुरू आहे
हिमाचल मधून येणारा सफरचंद एपीएमसी बाजारात दाखल झाला असून, अजून मागणी प्रमाणे आवक होत नाही. तर महाराष्ट्रातील सफरचंद पावसामुळे कमी प्रमाणात आणि खराब येत आहेत. जवळपास 70 टक्के खराब माल असून त्याला मागणी कमी आहे. त्याच प्रमाणे येणाऱ्या मालाला चवही चांगली नाही. अजून पंधरा ते वीस दिवस चांगला माल यायला जातील, त्यामुळे हिमाचल मधून येणाऱ्या सफरचंदाला मागणी असून किलोला 150 ते 160 रुपये दर सुरू आहे. तर काही दिवसात आवक वाढेल असेही व्यापारी सांगत आहेत.