लंपीच्या संकटानंतर जनावरांचे बाजार सुरू
लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यावर धुळ्यात आजपासून गुरांच्या बाजाराला सुरुवात;
धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सर्वात मोठा जनावरांचा बाजार भरत असतो. मात्र, लम्पी रोगाचे कारण देत जिल्हा प्रशासनाने जनावरांचा आठवडी बाजार दीड महिन्यांपासून बंद केला होता. मात्र आता लम्पीचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून गुरांच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने बाजारात आपले पशुधन विकण्यासाठी बाजारात दाखल झाले होते.
गोवंशय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद असलेल्या गुरांचा बाजार धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आजपासून सुरू करण्यात आला आहे. गुरांच्या बाजारातून होणारी लाखो रुपयांची उलाढाल ही पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. परंतु काही अटी शर्ती लावून हा बाजार सुरु करण्यात आला आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला होता जिल्ह्यातील 52 गावांमध्ये या आजाराचा शिरकाव झाला होता, जिल्ह्यातील १ हजार ३५३ जनावरांना याची लागण होऊन 34 जनावरांचा मृत्यू झाला होता. वाढत्या लम्पीच्या पार्श्वभूमीवर पशुविभागाने लसीकरण करण्यासह गुरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घातली होती. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून बंद असलेला गुरांचा बाजार आजपासून पूर्ववत सुरू झाला आहे. तर जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याने गुरांच्या बाजाराला आजपासून परवानगी दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान