महाराष्ट्राचा राजस्थानातही डंका, ई पीक पाहणीचा राजस्थानात होणार प्रयोग

( E- Pik Pahani) राज्य सरकारने राबवलेल्या ई-पीक पाहणी उपक्रम यशस्वी ठरला आहे. तर नुकसान भरपाईसाठी ई- पीक पाहणीच्या (E-peek pahani) माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) पीकांची नोंद केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राबवलेला उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता राजस्थान सरकारकडून हा उपक्रम ई-गिरदावरी (E-Girdawari) नावाने राबवण्यात येणार आहे.;

Update: 2022-01-10 08:43 GMT

राज्यातील विविध भागात वेगवेगळी पीकं घेतली जातात. मात्र आतापर्यंत सातबारावर विशिष्ट पिकांचीच नोंद (Crop Registration) झालेली आढळते. परंतू प्रमुख पिकांसोबतच शेतकरी इतर पिकेही घेत असतात. मात्र त्यांची नोंद सातबारावर केली जात नव्हती. त्यामुळे किती क्षेत्रावर कोणते पीक घेतले आहे याची अचूक माहिती सरकारकडे उपलब्ध होत नव्हती. तर नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळतानाही त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत होता. त्यामुळे 15 ऑगस्ट 2021 पासून राज्य सरकारच्या कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या 'ई-पीक पाहणी' उपक्रम राबवण्यास सुरूवात केली.

देशात 'ई-पीक पाहणी' हा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. तर 15 ऑगस्टपासून सुरू केलेल्या या उपक्रमामध्ये खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र हा उपक्रम सुरू करताना या प्रणालीतील चुकांवर बोट ठेवले. तर विरोधी पक्षांनी हा उपक्रमच बंद करण्याची मागणी केली होती. पण ई-पीक पाहणीच्या माध्यमातून कारभारातील नियमितता आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे थेट निरसण करण्यात आले होते. त्यामुळे राज्यात 'ई-पीक पाहणी' हा उपक्रम यशस्वी झाला. त्यामुळे या उपक्रमाचा अभ्यास करण्यासाठी राजस्थान सरकारने (Government of Rajsthan) जिल्हाधिकारी व तांत्रिक अधिकाऱ्यांचे पथक पाठवले होते. त्यांनी या उपक्रमाची माहिती घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांना या उपक्रमाची उपयुक्तता आढळून आल्याने राजस्थान सरकारने हा उपक्रम राबवण्याचे ठरवले. तर हा उपक्रम राजस्थानमध्ये ई-गिरदावरी या नावाने राबवण्यात येणार आहे, असे राजस्थानचे महसूलमंत्री राममलाल जाट यांनी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना सांगितले.

राज्य सरकारने खरीप हंगामात हा प्रयोग राबवण्याचे ठरवले. तर अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला. यामध्ये राज्यातील 58 लाख 39 हजार शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पीकाची नोंद केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात यशस्वी ठरल्यानंतर हा उपक्रम राजस्थान सरकारकडून राबवण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News