बोगस खतं-बियाणं कायद्या विरोधात कृषी केंद्र चालक संपावर
बोगस खत आणि बियाण्यांपासून नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या विधेयकांना विरोध करण्यासाठी राज्यातील कृषी सेवा केंद्र आजपासून 3 दिवस बंद राहणार आहेत.
राज्य सरकारने जे कायदे केले, ते हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने पाच विधेयक आणले, ते कृषी केंद्रासाठी अत्यंत घातक असल्याचे कृषी संचालकांचे मत असून या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी कृषी केंद्र संचालकांचा तीन दिवसीय संप पुकारला आहे. राज्यभर हा संप पुकारला असून अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 100 कृषी केंद्र राहणार 3 दिवस कडकडीत बंद राहणार आहेत.रब्बी हंगामातील पेरणी करिता शेती उपयोगी साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.