देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिवस; ऊसतोड कामगारांचे काय?
रोज सकाळचा चहा ज्या साखरेमुळे गोड लागतो त्या घोटभर चहाच्या साखरेसाठी राब राब राबणाऱ्या ,लाखो ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या व समस्या आजही प्रलंबितच आहेत, अशा शब्दात आमदार सुरेश धस यांनी ऊसतोड कामगारांचा प्रश्न विधान परिषदेत धसास लावला.;
नियम २६० अन्वये विधिमंडळ प्रस्तावावर अधिवेशनात ऊसतोड कामगार व गरोदर महिलांचे आरोग्य, ऊसतोड करणाऱ्या मुलांचे शिक्षण, ऊसतोडीमधे असलेली बालमजुरी, मुकादम, ऊसतोड कामगार वाहतूक ठेकेदार यांचे ज्वलंत प्रश्न मांडले. असंघटित कामगारांच्या यादीत ऊसतोड कामगारांची समावेश केला या निर्णयाचे स्वागत करुन महाराष्ट्र सरकारने देखील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी येत्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी स्वतंत्र कल्याणकारी कायदा आणावा अशी मागणी आमदार धस यांनी विधान परिषदेत केली.