RBI दोन हजाराचे 24 हजार कोटी गेले कुठे?
रिझर्व बँकेने जाहीर केली 2000 नोटांची सद्यस्थिती
नोटबंदीचा मास्टर स्ट्रोक ठरलेल्या दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची मुदत महिनाभरावर येऊन ठेपल्यानंतर 93% नोटा जमा झाल्या असून अजूनही 24000 कोटी बँकांमध्ये जमा होणे बाकी असल्याचं रिझर्व्ह बँकेने (RBI) सांगितलं आहे.
2016 मध्ये 500 आणि हजाराच्या नोटा बंद करून नव्या पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा जारी केल्यानंतर रिझर्व बँकेने अलीकडेच दोन हजार रुपयांच्या नोटा देखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये या नोटा जमा करण्याचे रिझर्व्ह बॅंकेचे आदेश आहेत. रिझर्व बँकेने दिले माहितीनुसार ९३ टक्के म्हणजेच तीन लाख 32 हजार कोटी रुपये दोन हजाराच्या नोटा आतापर्यंत जमा झाला आहेत अजूनही 24 हजार कोटी रुपये बँकांमध्ये परत येणे अपेक्षित असल्याचे रिझर्व बँकेने म्हटलं आहे.
19 मे 2019 रोजी दोन हजाराच्या नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर झाला त्यावेळेस 3.56 लाख कोटी इतक्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबर 2023 ही नोटा जमा करण्याची शेवटची तारीख जाहीर केली आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी दोन हजाराच्या 0.24 लाख कोटी इतक्या नोटा चलनात होत्या.
रिझर्व बँकेने पुढे दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत दोन हजार रुपयांच्या नोटा जमा झाल्या त्यामध्ये 87 टक्के नोटा या खात्यामध्ये जमा करण्यात आल्या तर उर्वरित 13 टक्के नोटा जमा करून त्या बदल्यात नव्या नोटा घेण्यात आले आहेत. दोन हजार रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 असून ग्राहकांनी लवकरात लवकर दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घ्याव्यात असे आवाहन रिझर्व्ह बँकेने केले आहे.