निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडलेल्या पाण्याचा विसर्ग 10 हजार क्यूसेसने वाढवण्यात आला आहे. तर भंडारदरा धरणातून आठ हजार क्यूसेसने पाणी सोडण्यात आहे आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील मोटारींचा वीजप्रवाह खंडित करावा, यासाठी जलसंपदा विभागाने जिल्हा प्रशासनाला कळविले असून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
विसर्ग वाढवला
नगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा धरणातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा निळवंडे समूहातून १० क्युसेसने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आहे आहे. त्यामुळे नदीपात्राच्या बंधाऱ्यातील फळ्या काढल्यानंतर या धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. यासंदर्भात काल प्रशासनाची बैठक झाली असून तसे नियोजन करण्यात आले आहे.