भिवंडीत मदरशातील २६ मुलांना अन्नातून विषबाधा 

Update: 2018-01-18 10:58 GMT

भिवंडीतील रोशन बाग भागातील दिवान शाह मदरशात शिकणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील ५ मुलांची प्रकृती गंभीर आहे. मदरशात मटन बिर्याणी खाल्यानंतर त्यांना अचानक उलट्यांचा त्रास होऊ लागला.

बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून यात नैर आलम, नबीर अहमद, रशीद शेख, सोहेल अहमद, अबीद हुसेन, फिरोज अख्तर, निजामुद्दीन, कलाम उद्दीन, मुद्दसीर, सागीर आलम, इम्रान मुगल, मोहम्मद जाफर, मो. इर्शाद आलम, मो. महेफुज मंसुरी, सागीरुल मुघल, शहाबाज, मो. जसीन, आफताब आलम, मो. नवीद, मरगुब, शाकीर, शहाजन, अफसर, अबीद खान, वसीम अख्तर या १३ ते १४ वयोगटातील २६ मुलांना अन्न विषबाधा झाली आहे.

विषबाधा झालेल्या रुग्णांना प्रथम स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र यातील पाच मुलांची प्रकृती चिंताजनक झाल्याने सर्वच मुलांना मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या मुलांनी रात्री मटण बिर्याणी खाल्याने त्यांना उलट्या, पोटात मळमळणे असा त्रास होवू लागल्याने मदरसामधील शिक्षकांनी मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.

या विद्यार्थ्यांवर उपचार करणारे डॉ. अनिल थ्रोटा म्हणाले, काल संध्याकाळी मदरशात बिर्याणी खाल्यानेच त्यांना उलट्यांचा त्रास झाला. कारण या उलट्या ही अन्नातील विषबाधेची लक्षणे आहेत.

Full View

 

Similar News