Mumbai : मॅक्स महाराष्ट्राच्या चिंतन वार्षिक अंक प्रकाशन सोहळ्याला वैद्यकीय शिक्षण विभागाचे, माजी संचालक तात्यासाहेब लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी अत्याधुनिक शेती आणि इंटरनेट आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या परिणामाविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पुढच्या वीस वर्षांपर्यंत माझं कुणी ऐकणार नाही, तरीही सांगतो. चार्लस् डार्विनचा सिध्दांत असा होता की, शेपटी गेली आणि माणूस जन्माला आला, पण आता यापुढील जन्माला येणारी पिढी खाली मान घालून जन्मणार आहेत.कारण आताची पिढी तासनतास मान खाली वाकवून मोबाईल वापरत आहे.
तात्या लहाने यांनी सांगितले, "मोबाईल अतिवापराचे तोटे"
मोबाईलच्या अतिवापराने मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाबद्दल बोलताना डॉ. तात्या लहाने म्हणाले की, दैनंदिन जीवनात बहुतांश माणसं सतत खाली मान घालून मोबाईल बघत असतात. मोबाईल नावाच्या उपकरणाने सर्वांची बुध्दी भ्रष्ट केली आहे. मोबाईलमुळे आपण आईवडील आणि घरच्यांना विसरलो. मोबाईलच्या अतिवापरामुळे आजचा माणुस आभासी जगात वावरत असून तो भावनाशु्न्य झाला आहे, माणसाच्या भावना आता इंटरनेटवर व्यक्त होऊ लागल्या असून आणि आपल्याला याचे भयंकर दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागताहेत, असं लहाने यावेळी म्हणाले.
दरम्यान लहाने असंही म्हणाले की, मोबाईल वापरामुळे केवळ डोळेच खराब होत नाहीत तर ५ टक्के मेंदूचा कॅन्सर होतो. तसेच यामुळे किडनीचे विविध आजार आणि संधिवात होऊन माणसांची अक्षरशः झोप उडाली आहे. मोबाईलचा अतिवापर न करता दिवसभरात तो फक्त दोन तास वापरावा त्यापेक्षा जास्त वापरू नये, असा सल्ला लहाने यांनी दिला.
लहाने यांनी आवर्जून सांगितलॆ की, आपण आपल्या आरोग्याला आयुष्यात अगदी शेवटचे स्थान दिले आहे. आरोग्याच्या मुद्द्यांवर आपण कायम दुर्लक्ष करतो आणि ऐनवेळी जेव्हा गरज पडते त्यावेळी हजारो रुपये खर्च करतो. त्यामूळे जमलंच तर तुम्ही नियमित व्यायाम करा कारण गेली २९ वर्षे सातत्याने मी व्यायाम करत आहे.