कोरोना नव्या JN1 विषाणूची लक्षण जाणून घ्या डॉ. अविनाश भोंडवे यांच्याकडून
गेल्या काही दिवसांपासून देशभरात करोना नवा विषाणूचा प्रसार वाढताना दिसत आहे. करोना विषाणूच्या जेएन-१ या नव्या उपप्रकारामुळे करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे, असे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी करोनाचे जेएन-१ (JN-1) या विषाणूचे नेमक लक्षणं काय आहे? यासाठी कशी काळजी घ्यावी? या संदर्भात सविस्तर विश्लेषण केले आहेत
JN1 विषाणूची लक्षणे
JN1 विषाणूबाबत डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की "या विषाणूची लक्षणे ही आधीच्या कोरोना सारखीच आहेत. सर्दी, खोकला, अंग दुखणे, ताप येणे, ही JN 1 नव्या कोरोना विषाणूची लक्षणे आहेत. परंतू ही लक्षणे फार तीव्र नसतात. या विषाणूमुळे किडणी हृदय यकृतावर परिणाम होत नाही. हे विषाणू श्वसनामार्फत शरिरात जातात त्यामुळे रूग्णाचा ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता आहे. JN 1 हा ओमायक्रॉन विषाणू चा उपप्रकार आहे. कोरोना जरी होवून गेला असेल किंवा आधी लस जरी घेतली असेल तरी कोरोना नव्या विषयांची म्हणजेच JN1 विषाणूची लागण होवू शकते. हा आजारत ५ ते ७ दिवसात बरा होत असल्याचंही डॉक्टर भोंडवे यांनी सांगितले आहे.
N1 विषाणू स्वत:चे संरक्षण कसे करावे?
तुमच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढल्यास गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावे. मोकळी हवा असलेल्या ठिकाणी राहिल्यास करोना संसर्गाची शक्यता कमी होते. वारंवार हात धुवायला हवेत, तोंडाला नाकाला हात लावणे टाळावे.