Max Maharashtra | मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीला पुरस्कार...!

Update: 2024-03-21 09:12 GMT

मुक्त पत्रकार शैलजा तिवले यांना मॅक्समहाराष्ट्रवर प्रसिद्ध झालेल्या ‘टीबी समुपदेशकांची उणीव कशी भरून काढणार?’ या लेखासाठी प्रतिष्ठित ‘रिच मिडिया अवॉर्ड फॉर एक्सिलेन्स इन टीबी रिपोर्टिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टीबीच्या रुग्णांचे शारीरिक, मानसिक त्रासासह त्यांचे सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक प्रश्न समजून त्यांना उपचार पूर्ण करण्यात सक्षम करण्यामध्ये टीबी समुपदेशकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशा टीबी समुपदेशकांची राज्यात मोठ्या प्रमाणावर गरज आहे. परंतु याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष न दिल्याने समुपदेशकांची अनेक पदे रिक्त असल्याचे वास्तव या लेखामध्ये शैलजा तिवले यांनी मांडले होते.समुपदेशकांशिवाय २०२५ पर्यत भारत टीबी मुक्त कसा होईल असा प्रश्नही या लेखाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित केला होता. हा लेख मॅक्समहाराष्ट्रावर नॅशनल फाऊंडेशन फॉर इंडिया या फेलोशीपअंतर्गत २९ जानेवारी २०२३ ला प्रसिद्ध झाला होता.

हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे मंगळवारी पार पडला असून यामध्ये स्थानिक भाषीय आणि इंग्रजी माध्यमातील प्रत्येकी दोन अशा चार पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध राज्यामध्ये कार्यरत असलेल्या टीबी चॅम्पियन्सलाही सन्मानित केले गेले.

Tags:    

Similar News