Health Tips | अशी घ्या तीव्र उन्हाळ्यात स्वतःच्या आरोग्याची काळजी...!

Update: 2024-04-18 08:18 GMT

उन्हाचा चटका, गरम हवेच्या झळा, उकाडयामुळे होणारी जीवाची काहिली वाढत्या तापमानामुळे कायम राहणार आहे. मुंबईत गेल्या दहा वर्षांतील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी झाली. सांताक्रूझ केंद्राने सरासरी ३९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली तर ठाण्यात सरासरी ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे नागरीकांनी वाढत्या तापमानामुळे होणाऱ्या उष्माघाताला बळी न पडता आपली काळजी घ्यावी. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही महाराष्ट्रासह देशभरात उष्माघातामुळे नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात.

तापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे त्याचे गंभीर परिणाम मानवी शरिरावर होऊ शकतात. सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला अचानक झालेली ही तापमानवाढ सहन करता येऊ शकते. पण नवजात बालकं, वयोवृद्ध व्यक्ती किंवा जुने गंभीर आजार असलेल्या लोकांवर याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

स्वतःच्या आरोग्याची अशी घ्या काळजी

  • शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवावं. तहान लागली नाही तरी मुबलक प्रमाणात पाणी प्यावं.
  • लिंबू सरबत, उसाचा रस, तांदळाची पेज, ताक आदी पेय पिता येऊ शकतात.
  • चहा-कॉफी, मद्यपान, सॉफ्ट ड्रिंक यांच्यामुळे शरिरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे ते टाळायला हवेत.
  • हलक्या रंगाचे, सुती कपडे परिधान करावेत. बाहेर पडल्यानंतर शक्यतो डोकं टोपी, रुमाल यांनी झाकावं.
  • किमान दोनवेळा थंड पाण्याने आंघोळ करावी.
  • थोड्या थोड्या वेळाने खात रहा.
  • भरपूर पाणी प्या आणि फळांचा रस घ्या.
  • मद्यपान, साखर आणि कॅफीन टाळा.
  • बंदिस्त ठिकाणी जाणे शक्यतो टाळा.
  • योग्य कपडे निवडा आणि सनस्क्रीन वापरा.

Tags:    

Similar News