आपलं आरोग्य निरोगी आणि सदृढ ठेवण्यासाठी अनेक फळे महत्त्वाची आहेत. त्यापैकी एक फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब हे फळ खाल्याने अनेक आजार आपम लांब पळवू शकतो. अशक्तपणा दूर करण्यासाठी डाळिंब खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. आणखी काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या...
डाळिंब खाण्याचे फायदे :
- डाळिंबामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. डाळिंबाच्या रसामध्ये इतर फळांच्या रसापेक्षा जास्त अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.
- कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर तुम्ही डाळिंब खालले पाहिजे. कॅन्सरने त्रस्त लोकांसाठी डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. प्रोस्टेट कर्करोगाच्या पेशी टाळण्यासाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन केले पाहिजे. त्यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.
- अल्झायमरपासून बचाव करायचा असेल तरी डाळिंब खाल्ले पाहिजे. याच्या बिया अल्झायमर रोगाचा विकास रोखतात आणि व्यक्तीची स्मरणशक्ती मजबूत करतात.
- पचनसंस्थेसाठी डाळिंबाचा रस आतड्यांतील जळजळ कमी करून पचनशक्ती सुधारते.
- सांधेदुखी, वेदना आणि इतर प्रकारच्या संधिवातावर डाळिंबाचा रस फायदेशीर आहे.
- डाळिंबाचा रस हृदयविकारावर देखील फायदेशीर आहे.
- रक्तदाबाच्या रुग्णांसाठी देखील डाळिंबाचा रस फायदेशीर मानला जातो.
- धुमेहाच्या उपचारात डाळिंबाचा रस प्यावा. डाळिंब इंसुलिन आणि रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते.
या लोकांनी खाऊ नये डाळिंब :
- ज्यांना कमी रक्तदाब आहे अशा रुग्णांनी डाळिंबाच्या रसाचे सेवन कमी प्रमाणात करावे.
- ज्यांना डायरिया आजार झालेला असेल त्यांनी डाळिंबाचा रस पिऊ नये
- जर तुम्ही तुमच्या त्वचेवर डाळिंबाचा रस लावलात तर अनेकांना खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.